पुणे रिंग रोड नजिकच्या ११७ गावांचा,एमएमआरडीसी मार्फत होणार विकास.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे:- पुणे शहराजवळील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) १३७ किमी लांबीचा पुणे रिंग रोड प्रकल्प नुकताचं हाती घेतला आहे. राज्य शासनाने या रिंगरोड जवळच्या पाच तालुक्यांमधील ११७ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ‘एमएसआरडीसी’ची नियुक्ती केली आहे.त्यानुसारच आता ११७ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा प्रसिद्ध केला असून, येत्या आठ महिन्यांत हा विकास आराखडा डीपी तयार करण्यात येणार आहे.

रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या जागेचं संपादन करण्यात येत आहे. या रिंगरोडजवळ २ विकास केंद्रे प्रस्तावित असून ते ‘एमएसआरडीसी’कडून विकसित करण्याचा मानस आहे. सुमारे ६६८ चौ. किमी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून ‘एमएसआरडीसी’ याचं काम पाहणार आहे.

रिंगरोडप्रकल्पाच्या विकासाशी संबंधित खर्चाची भरपाई विचारात घेता भूसंपादनासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी विविध मॉडेल्सचा वापर करून या प्रदेशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटन सुलभ करण्यासह या गावांतील बांधकाम परवानगीचे अधिकार सुद्धा ‘एमएसआरडीसीकडे असणार आहेत.

५ तालुक्यातील ११७ गावांचा  विकास आराखडा तयार होणार….!!

भोर : भांबवडे, भोंगवली, धांगवडी, गुणंद, केंजळ, खडकी, मोरवाडी, न्हावी, निगडे, पांदे, पांजळवाडी, राजापूर, सांगवी खुर्द, सारोळे, सवर्डर, तपरेवाडी, उंबरे, वाठार खुर्द, वाघजवाडी, देगाव, दिडघर, जांभळी, कंबारे, कंजाळे, करांदी, केटकवणे, खोपे, कोळवाडी, कुरुंगवाडी, कुसगाव, माळेगाव, पर्वडी, रांजे, सालवडे, सांगवी बुद्रुक, सोनवाडी, विरवाडी.

मुळशी : मुठा, बोतरवाडी, आंदगाव, खारावडे, साईव खुर्द, काटवडी, डावजे, माळेगाव, वाजले, वातुंडे, जातेडे, चिंचवड, कोंदूर, चिखली बुद्रुक, बेलावडे, दरवळी, भरेकरवाडी, मोरेवाडी, विठ्ठलवाडी, टेमघर, खेचरे, मारणेवाडी, कोंढवले.

पुरंदर : कोडित खुर्द, पूर, पोखर, वारवाडी, कुंभोशी, सोमुडर्डी, घेरापुरंदर, सुपे खुर्द, मिसळवाडी, थापेवाडी, भिवरी, भिवडी, बहीरवाडी, भोपगाव, पाथरवाडी, पिंपळे, पानवडी, हिवरे, कोडित बुद्रुक, अस्करवाडी, चांबळी, बोरहळेवाडी, गारडे.

वेल्हे : वरसगाव, कुरण बुद्रुक, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, ओसाडे, निगडे मोसे.

हवेली : गोगलवाडी, माळखेड, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, माणेरवाडी, खानापूर, थोपटेवाडी, गोरे खुर्द, गोरे बुद्रुक, आगळंबे, जांभळी, भगतवाडी, घेरा सिंहगड, डोणजे, वांजळेवाडी, खाडेवाडी, बहुली, सोनापूर, वरदाडे, संभारेवाडी, खामगाव मावळ, मोगरवाडी, कुडजे, मोकरवाडी.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool