सामूहिक जागरण गोंधळाची परंपरा , चांदगुडे परिवाराच्या १० व्या पिढीकडून आजही कायम.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

इंदापूर:- हिंदू संस्कृतीमध्ये जागरण गोंधळ घालण्याची परंपरा आजही रितीवाजाप्रमाणे चालू आहे परंतु त्याचा खर्च आजच्या घडीला परवडण्यासारखा राहिलेला नाही तसेच तो खर्च आज लाखोंच्या घरात जात आहे.

याला अपवाद ठरले आहे ते इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील रहिवासी असणारा चांदगुडे परिवार , त्यांच्या पूर्वजांनी सामूहिक जागरण गोंधळ करण्याचा पायंडा पाडला होता ,व तो पुढे नेहण्यासाठी आजच्या घडीला त्यांची १० वी पिढी कार्यरत असताना दिसत आहे.चांदगुडे परिवाराचे मूळ पुरुष गंगाजीराव व त्यांची ४ मुले यांनी हि परंपरा त्यांच्या काळात सुरू केली व त्यांच्या ह्या परंपरेला आजची त्यांची १० वी पिढी पुढे निभावताना दिसून येत आहे.

चांदगुडे परिवाराच्या १० व्या पिढीने दर वर्षाआड आपल्या कुल दैवताचा जागरण गोंधळ सामूहिकरित्या पार पाडण्याचा जणूकाही संकल्प केला असल्याचा या कृतीमधून दिसत आहे,सामूहिकरित्या जागरण गोंधळ करण्याचे फायदे पुढील प्रमाणे दिसून येत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण परिवार हा एक संघ राहतो तसेच होणाऱ्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होताना दिसत आहे व दर वर्षाआड आपल्या कुल दैवताचा जागरण गोंधळ परंपरेप्रमाणे होत आहे त्यामुळे याचं अनुकरण इतर परिवारातील सदस्यांनी करणे आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या कुल दैवताचा हिंदू संस्कृती परंपरेनं दरवर्षी किंवा एक वर्षाआड जागरण गोंधळ होणे अपेक्षित आहे परंतु त्याच्या होणाऱ्या अवाढव्य खर्चामुळे बरेचजण या फंदामध्ये पडताना दिसत नाहीत त्यामुळे त्यांच्या कुल दैवताचा जागरण गोंधळ विधिवत रीत्या होताना दिसत नाही ,त्यामुळे त्यांना आपल्या प्रपंचामध्ये अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.

आजच्या घडीला इतर समाजातील सदस्यांनी चांदगुडे परिवाराची प्रेरणा घेऊन सामूहिक जागरण गोंधळ घालण्याची परंपरा चालू करावी जेणेकरून त्यांचाही परिवार एकत्र राहील व मोठ्या होणाऱ्या खर्चामध्ये कुठेतरी बचत होईल व जेणेकरून ही परंपरा वर्षाला किंवा एक वर्षाआड चालू राहील.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai