रायरेश्वर भुखंड घोटाळा प्रकरणी ; शिवभक्त समिर घोडेकर यांचे भोर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण…..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भोर प्रतिनिधी
भोर,तालुक्यातील रायरेश्वर परिसरात प्राचीन शिवमंदिर असून याच ठिकाणी शिवकाळात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराला साक्षी मानून स्वराज्याची शपथ घेतली होती, परंतू आता याचं रायरेश्वर मंदिर व परिसरातील जमीन घोटाळा हा आता उघडकीस आला आहे, त्याला कारण ठरलं आहे ते म्हणजे भोरचे आसणारे शिवभक्त समिर रमेश घोडेकर हे भोर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले आहेत. सदरील प्रकरणाची हकीकत पुढील प्रमाणे आहे.
रायरेश्वर परिसरातील प्राचीन महादेव मंदिराची जमिन भोरचे माजी मंत्री आनंतराव थोपटे यांनी डोंगरी विकास परिषद या संस्थेच्या नावावर केली होती ती नोंद रद्द करण्यात यावी म्हणून भोर तालुक्यातील शिवभक्त असणारे समिर रमेश घोडेकर हे भोर येथील तहसील कार्यालयासमोर दि 18 सष्टेंबर पासून अमरण उपोषणास बसले आहेत तसेच त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन हे तहसीलदार भोर यांचेकडे सादर केले आहे, तसेच त्यांच्या मागण्या हया पुढील प्रमाणे आहेत.
१) तत्कालिक तहसीलदार व माजी मंत्री श्री आनंतराव थोपटे यांची शासनाच्या वतीने सखोल चौकशी करून शासन व जनतेची फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
२) या प्रकरणातील गंभीर स्वरूपाच्या ७/१२ वरची नोंद ही डोंगरी विकास परिषद या संस्थेच्या नावावर माजी मंत्री आनंतराव थोपटे यांनी जी बोगस नोंद केली आहे ती तात्काळ नोंद रद्द करण्यात यावी तसेच संबंधितावर शासन व जनतेची फसवणूक म्हणून तात्काळ गुन्हे दाखल करावेत.
३) सदर रायरेश्वर मंदीरच्या परिसराचा ७/१२ हा माजी मंत्री आनंतराव थोपटे यांनी नोंद करण्यासाठीचा उद्देशाबाबत त्यांचा कागदोपत्री पुराव्यानिशी जबाब नोंद करण्यात यावा आणि समाजहितासाठी सर्वांकरिता सार्वजनिक करण्यात यावा.
सदरील उपोषण स्थळाला शिवसेना नेते कुलदीप तात्या कोंडे (देशमुख ) यांनी भेट दिली आहे. तसेच या उपोषण स्थळी भोर भाजप अध्यक्ष अमर बुदगुडे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष- कुणाल धुमाळ, भोरचे व्यापारी- संतोष शेटे, सामाजिक कार्यकर्ते- माऊली बदक, सुनिल जंगम, संजय डाळ, गोविंद तनपुरे, सचिन देशमुख, उल्हास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष- अतुल काकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच या चालु असलेल्या अमरण उपोषणाला किरण दगडे पाटील यांनी पाठींबा दिला आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें