जनसंघर्ष न्यूज
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत देशात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब जनतेला मोफत धान्य हे केंद्र सरकार कडून पुरवले जाते. त्यासाठी नियम अटी नुसार लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका हया देण्यात येतात.
सदरील शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानांवर लाभार्थ्यांना हे धान्य मिळत असते. परंतू ते धान्य गरजू गोरगरीब जनतेलाच मिळावे आणि बोगस गिरीला कोठेतरी आळा बसावा म्हणून शिधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास येत्या 1ऑक्टोबर पासून तुम्हाला धान्य मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या कुटंबातील कोणत्या सदस्याची ई-केवायसी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई-केवायसी झालेली नाही, तपासणे आता गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर हे कसे तपासावे ते आपण जाणून घेणार आहोत.
ज्या शिधापत्रिकाधरकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना यांचे रेशन कार्ड येत्या 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकाधारकांना त्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. घरात किती सदस्य आहेत, एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्यांच्या हक्काचा शिधा मिळावा यासाठी ई-केवायसी केली जात आहे.
सर्व प्रथम तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज आहे की नाही हे तपासावे लागेल. त्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारने प्लेस्टोअर वर मेरा राशन हे ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे ते आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमची इतर माहिती व ई-केवायसीचे स्टेटस तपासू शकता.
शिधा पत्रिकेची ई-केवायसी झालेली आहे की नाही, हे कसे तपासावे?त्यानंतर मेरा राशन ॲप चालू करून तुमचा शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी चे त्यामध्ये ऑप्शन दिसेल.12अंकी आधार क्रमांक किंवा 12 अंकी ऑनलाईन शिधापत्रिका क्रमांक यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करणे. त्यानंतर आधार सिडींग वरील ऑप्शनवर यावे,त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडींग YES किंवा NO असा ऑप्शन दिसेल. ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापुढे NO असा ऑप्शन असेल त्या प्रत्येक सदस्याला यापुढे ही ई-केवायसी करावी लागणार आहे. तसेच ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या महाफूड विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 139