जन संघर्ष न्यूजटीम
म्हसवड, पालिका हद्दीतील मसाई वाडी येथील पानवन रस्त्यालगत असलेल्या एका विहीरीत दि.13 रोजी सकाळी एक मृत्युदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगत असल्याची शहरामध्ये एकच चर्चा सुरु असताना पोलीसांनी घटनास्थळी जावुन प्रत्यक्षात पाहणी केली असता एका महिलेचा मृत्यु देह विहिरीवरील पाण्यावर तरंगताना दिसुन आल्याने पोलीसांनी तात्काळ घटनास्थळावर पंचनामा करुन याची नोंद पोलिस दप्तरी करत तपासाला सुरुवात केल्यावर,
ज्या विहीरीत हा मृत्यु देह आढळुन आला ती विहीर शहरा पासुन दुर असलेल्या मसाईवाडी परिसरातील पाणवन रस्त्यालगत निर्जन स्थळी असुन मुृत्यु देहाची पोलीसांनी तपासणी केली असता त्या मृत्यु देहावर काही ठिकाणी खोलवर जखमा तर गळ्यावरती तीक्ष्ण हत्याराने वार केल्याप्रमाणे जखम आढळुन आल्याने सदर व्यक्तीचा खून झाल्याचा पोलीसांचा संशय बळावला त्यांनी त्वरित ही बाब उप विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांना कळवली, सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन शेंडगे यांनी स.पो.नि. सखाराम बिराजदार यांना योग्य त्या सुचना देत तपासाची जोरदार चक्रे फिरवत अवघ्या सहा तासातच दिवड तालुका माण येथील समाधान विलास चव्हाण यास त्याच्या शेतामधून ताब्यात घेतले.याबाबत पोलीस स्टेशन कडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटूकडे वय ( 25 ) यांचे प्रेमसंबध होते, राशी हा तृतीयपंथी होता तो सतत समाधान चव्हाण यास माझ्यासोबत लग्न कर असे म्हणुन त्याचा मागे सतत तगादा लावत होता तर राशी हा तृतीयपंथी असल्याने समाधान हा सतत त्याला टाळत होता, मात्र राशी काही केल्या ऐकत नसल्याने समाधान याने तिचा कायमचा काटा काढायचे ठरवुन रविवार दिनांक 8 ऑगष्ट रोजी राशीला सोबत घेवुन येथील मसाईवाडी परिसरातील नागोबा – पाणवन रस्त्यालगत आला त्याठिकाणी समाधान याने राशी हिचा गळा आवळुन खुन केला व नंतर तिचा मृत्यु देहाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळुन त्याच्यासोबत एक दगड बांधला अन् तो मृत्यदेह जवळच असलेल्या एका विहिरीत टाकला त्यानंतर तो आपल्या मोटारसायकल वरुन निघुन गेला.
तीन, चार दिवसांनी विहीरीमधील तो मृतदेह फुगुन पाण्यावर तरंगू लागला त्यानंतर याची खबर पोलीसांना लागताच पोलीसांनी मृत्यु देहाच्या अंगावरील खुनांवरुन त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता तो मृत्यु देह हा मोटेवाडी. तालुका माण येथील राशी उर्फ राहुल घुटूकडे याचा असल्याचे निष्पन्न झाले. तद्नंतर पोलीसांनी आपल्या गोपनीय खात्यामार्फत व खबऱ्या कडून याची माहिती मिळवली तेव्हा दिवड येथील समाधान चव्हाण व मयत घुटूकडे यांचे प्रेम संबध असल्याचे समोर आल्यावर दि.१४ रोजी पोलीसांनी अत्यंत शिताफीने संशयीत समाधान चव्हाण यास ताब्यात घेतले, त्याच्याकडे पोलीसांनी कसुन चौकशी केली असता त्याने सदर खुनाची कबुली म्हसवड पोलीसांना दिली. या खुनाच्या तपास कामी उप विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलिस निरिक्षक सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अंमलदार शशीकांत खाडे, अभिजीत भादुले, अमर नारनवर, पोपट चव्हाण, रुपाली फडतरे, नवनाथ शिरकुळे, जगन्नाथ लुबाळ, अनिल वाघमोडे, कवडे, वासम मुलाणी,व श्रीकांत सुद्रीक यांनी विशेष परिश्रम घेतल्याने त्यांचे सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 104