जनसंघर्ष न्युज नेटवर्क / बातमीसाठी संपर्क–७५८८६२२३६३
🟩 “छत्रपती साखर कारखाना आपला परिवार; सभासदांचे नुकसान होऊ देणार नाही!” — उपमुख्यमंत्री अजित पवार 🟩 अर्थ, सहकार व कृषी खात्याच्या माध्यमातून कारखान्यांना मदतीची ग्वाही — व्याजात सवलत, सहवीजनिर्मितीचा दिलासा
इंदापूर, ता.१:— “छत्रपती साखर कारखाना हा फक्त एक संस्था नाही, तर आपला परिवार आहे. कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक जबाबदारीने काम पाहत आहेत. राज्यसरकार कारखान्यांच्या पाठिशी ठाम उभे आहे. अर्थ, सहकार व कृषी खात्याच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जात आहे. बँकांच्या व्याजात सवलत मिळणार असून, सहवीजनिर्मितीतून कारखान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
ते श्री छत्रपती साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ व गव्हाण पूजन सोहळ्यात बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “कारखान्याचे वैभव टिकवायचे असेल, तर सभासदांनी आपला सर्व ऊस छत्रपती कारखान्यालाच द्यावा. अधिकारी व कामगारांनी जबाबदारीने काम करावे. सभासदांचे नुकसान होऊ देणार नाही. कामगारांनी शिस्त पाळून काम करावे.”
ते पुढे म्हणाले, “या वर्षी ॲडव्हान्स किती मिळेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र सध्या दोन मतप्रवाह आहेत — काही जण चालू हंगामातील रिकव्हरी नुसार एफआरपी द्यावी असे म्हणतात, तर काहींचे मत गेल्या वर्षाच्या रिकव्हरीनुसार द्यावी असे आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल आहेत. तरीही शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. सभासदांचे नुकसान होऊ देणार नाही, हे सरकारचे स्पष्ट धोरण आहे,” असे पवार यांनी ठासून सांगितले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “छत्रपती साखर कारखाना हा आपल्या सर्वांचा आहे. या कारखान्याचा दर चांगला राहील. प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस गाळपात जाणार आहे. सभासदांनी पूर्ण सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले, “शेतकऱ्यांच्या बिलामधून कोणतीही कपात होणार नाही. उसाची तोडणी नियमानुसार केली जाईल. शेतकऱ्यांच्या हिताला आमचे प्राधान्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात गुणवडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी तानाजी काटे यांनी एकरी तब्बल १२८ टन ऊस उत्पादनाचा विक्रम केला. त्यांच्या सत्काराचा उपक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.
या वेळी उपस्थित मान्यवर:
सारिका भरणे, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक शिवाजी निंबाळकर, ॲड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
🔹 यातील ठळक मुद्दे काय ? 🔹
“छत्रपती साखर कारखाना हा आपला परिवार” — अजित पवार
कारखान्यांना अर्थ, सहकार व कृषी खात्याकडून मदत
बँकांच्या व्याजात सवलतीची घोषणा
सहवीज निर्मितीतून दिलासा देणार
गुणवडी येथील तानाजी काटे यांचा एकरात १२८ टन ऊस काढल्याबद्दल सत्कार
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 7,042









