जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे :-रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे २५ मार्च रोजी वंदना रोहिदास शेटे (वय ३३) धंदा व्यवसाय स्नॅक्स सेंटर रा. पिंपरी दुमाला ता शिरुर जि. पुणे या रांजणगाव गणपती चौक येथील धनगरवाडा स्नॅक्स सेंटर मध्ये उभ्या असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकल वरुन दुकानाचे समोर आले त्यापैकी एकजण. दुकानात आला व त्याने पाण्याची बॉटल दया,असे म्हणुन पैसे दिले उरलेले पैसे देताना ड्रॉवर मधील पैसे देताना वाकल्या असताना आरोपीने त्यांचे गळयातील ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने ओढुन नेले होते. त्याबाबत फिर्यादीने रांजणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली होती.
या गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथक करीत होते. तपासा दरम्यान घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज तपासुन चोरटयांनी गुन्हा करते वेळी वापरलेली स्पोर्टस बाईक टि व्हि एस अपाची कंपनीची असल्याचे निष्पन्न केली. तसेच दरम्यानच्या काळात शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड, चाकण, आळंदी पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी हि अश्या पध्दतीचे गुन्हे घडल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिले होते.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस व रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पथक यांचा शोध घेत असताना अश्या प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच जेल रिलीज झालेले गुन्हेगार यांना चेक केले तसेच सर्व घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज प्राप्त करुन ती एकत्रित करुन त्यांची तपासणी करुन आरोपीचा जाणेचा व येणेचा मार्ग निश्चित करुन सदर मार्गावर गेले दहा दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशनकडील पथक संयुक्तरीत्या सापळे लावण्यात आले होते परंतु आरोपी हे वारंवार चकवा देत होते. घटनास्थळापासुन ते बीड जिल्हयापर्यत सुमारे ३०० ते ३५० कॅमेरे तपासण्यात आले.
तसेच सर्व घटनास्थळांवरील तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराकडुन माहिती काढून त्याआधारे सदरचा गुन्हा हा मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८ रा लिंबोडी पोस्ट देवीनिमगाव ता आष्टी जि बीड )यांने त्याचा साथीदार शरद बापु पवार (रा लोणी सय्यदमीर ता आष्टी जि बीड) याचेसह केला असल्याचे निष्पन्न झालेने सदर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी मारुती आंधळे हा अहिल्यानगर ते शिरुर त्यांचेकडे असलेल्या स्पोर्टस बाईक वरुन येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस अमंलदार उमेश कुतवळ यांना मिळालेने त्यास स्थानिक गुन्हे शाखेने शिरुर हददीत सतरा कमान पुलाचे अलीकडे सापळा लावुन त्यांचे जवळील टि व्हि एस कंपनीची अपाची आर १६० मॉडेलची मोटार सायकलसह ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा त्यांचा मित्र शरद पवार यांचेसह केल्याचे सागितले.
तसेच त्यांनी शिरुर , शिक्रापुर व पिपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशन हददीत अश्या प्रकाराचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपीनी गुन्हयात वापरलेली टि व्हि एस अपाची मोटार सायकल व एकुण ८ गुन्हयातील १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण किंमत १० लाख १० हजार रुपयेचा मुददेमाल हस्तगत केला आहे.आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे विभाग अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन , संजू जाधव,योगेश नागरगोजे,सागर धुमाळ,रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहा फौजदार दत्ता शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, पोलीस अंमलदार योगेश गुंड, पोलीस अंमलदार संतोष साळुंखे, पोलीस अंमलदार खरबस, साळवे यांनी केली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह