जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. पांडुरंग संभाजी गावडे यांनी केलेला धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे , सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयाचा शिक्का बोगस प्रमाणपत्रावर मारून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सतिश महादेव गावडे लिमटेक बारामती यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रूग्णालय औंध पुणे व उपविभागीय अधिकारी बारामती यांना दिली असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत गावडे बोलत होते.
बारामती तालुका पोलीस स्टेशन याठिकाणी एका गुन्ह्यामध्ये डॉ. गावडे यांनी त्यांच्या हॉस्पीटलच्या मेडिको लीगल प्रमाणपत्रावर सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटल बारामती मेडिकल ऑफिसर असलेला शिक्का मारून, सदरचे प्रमाणपत्र नाही. शासकीय हॉस्पीटलचे असल्याचे भासवून तपासी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे. संबंधित तपासी अधिकाऱ्यांनी मे. कोर्टात सदरचे प्रमाणपत्र सादर केले आहे. सतिश गावडे व नलिनी गावडे यांच्या विरोधात सदरचे प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. मात्र, या दोघांचे नशिब या प्रकरणात मे. कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
डॉ. गावडे हे सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटल याठिकाणी मेडिकल ऑफीसर म्हणून सन २०१० ते २०११ या कालावधीत कार्यरत होते.
सन २०१४नंतर शासनाकडून रूग्णालय १०० खाटांचे झाल्याने सदरच्या शिक्क्याचा वापर बंद करण्यात आला होता.
डॉ. गावडे यांनी शासकीय शिक्क्याचा गैरवापर केल्याबाबत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. गुनवडी रोड येथील गावडे ॲक्सिडेंट ॲण्ड मॅटर्निटी हॉस्पीटल याची चौकशी करून या हॉस्पीटलमध्ये शासनाच्या चालू असलेल्या योजना रद्द करण्यात याव्यात. शासकीय शिक्का तात्काळ जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
डॉ. गावडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी सदरचे प्रमाणपत्र हे गावडे हॉस्पीटलचे इंज्यूरी सर्टिफिकेट आहे. त्यावरील जखमा या साध्या स्वरूपाच्या आहेत. ज्या जखमा खऱ्या आहेत त्याच आहेत. त्यात सिरीयस असे नाही त्यामुळे विरोधी पार्टीस त्रास होईल किंवा कलम वाढतील असा कोणताही उद्देश त्यामध्ये नाही. पण सर्टिफिकेटवर शिक्का सिल्व्हर ज्युबिली असा आहे तो कसा आला हे मला सांगता येणार नाही. पण त्या शिक्का व सर्टिफिकिट्समुळे आरोपीची शिक्षा वाढते असे कधीही होत नाही किंवा त्याचा १ टक्का सुद्धा फायदा नाही तो शिक्का मुद्दाम, खोडसाळपणे किंवा अनावधानाने कोणीतरी त्याचा वापर केला असावा असे मला वाटते. मुद्दाम आरोपीला शिक्षा वाढावी असे असते तर सर्टिफिकेट हे सिल्व्हर ज्युबिलीच्या लेटरहेड वर वापरले असते व सिरीयस दाखवले असते पण तसे सर्टिफिकिट्समध्ये काहीही नाही त्यामुळे आरोपीला शिक्षा वाढावी म्हणून असला कोणताही उद्देश यामध्ये नाही

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 495