जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
नवी दिल्लीः- जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. भारताकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या एअर फोर्स चीफ, नौदल प्रमुख, आणि संरक्षण सचिव यांच्या सोबत सतत उच्चस्तरीय बैठकांचा धडाका सुरु आहे.
पाकिस्तानला सुद्धा जाम युद्धाची खुमखुमी ही आली आहे. म्हणून पाकिस्तानचे नेते भारताला सतत पोकळ स्वरूपाच्या धमक्या देत आहेत. हे सगळं सुरु असतानाच आता पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. पाकिस्तानच्या बाजूने टर्की देश उभा राहिल अशी स्थिती असतानाच आता भारताचा जुना मित्र तसेच संकटकाळात भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा देश म्हणजे रशियाने भारताला उघडपणे पाठींबा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. पुतिन यांनी, भारतात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच त्यांनी निरपराध व्यक्तींच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दहशतवादाविरुद्ध आपण शेवटपर्यंत भारतासोबत राहणार आहोत, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.
या क्रूर हल्ल्याचे कारस्थान रचणाऱ्यांना कठोरातील कठोर शासन हे झाले पाहिजे असे भारत आणि रशिया या दोन्ही देशातील नेत्यांचे मत आहे. दोन्ही नेत्यांनी रणनतीक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. रणनतीक भागीदारी हे शब्द पाकिस्तानसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा असणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पुतिन यांना ८० व्या विजय दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या आहेत. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारतात आयोजित होणाऱ्या वार्षिक शिखर सम्मेलनाचं निमंत्रण सुद्धा पुतिन यांना देण्यात आले आहे.
तुर्कीच्या युद्धनौका पाकिस्तानच्या बंदरात दाखल .
सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुर्कीच्या युद्धनौका ह्या पाकिस्तानच्या बंदरांमध्ये आलेल्या दिसत आहेत. तसेच त्यांचे सैन्य अधिकारी पाकिस्तानी एअर फोर्सच्या ऑफिसमध्ये दिसत आहेत. अशावेळी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे भारतासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे वक्तव्य खूप मोलाचं ठरणार आहे.
युद्ध झाले तर,पाकिस्तानला परवडण्याजोगं नाही ...
रशियाकडून भारताला मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे. हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा झटका असणार आहे. रशियासारख्या बलाढ्य देशानं भारतासोबत खंबीरपणानं उभा राहणे हे पाकिस्तानला कदापीही परवडण्याजोगं नाही. भारत आणि रशिया हे खुप वर्षांपुर्वीचे जुने मित्र आहेत. अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये उत्तम प्रकारे संरक्षण विषयक संबंध आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ निर्दोष पर्यटकांची हत्या करण्यात आली. तसेच बहुसंख्य पर्यटक यामध्ये जखमी झाले आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला असल्याचे परिस्थिती पुराव्यांनुसार पुढे आले आहे व त्याचा पुढील तपास भारतीय गुुप्तच यंत्रणा करत आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 617