खंडाळा तालुक्यातील एकुण ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

साताराः- खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ही खंडाळा पंचायत समितीच्या किसनवीर स्मारक सभागृहात तहसीलदार अजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली. या प्रसंगी सातारा उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांचेसह तालुक्यातील सर्व गावांमधील सरपंच,प्रमुख पदाधिकारी, तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन २०२५-२०३० मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडूकांसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात निर्विवादपणे पार पडली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून भगवान कांबळे यावेळी उपस्थित होते. तहसीलदार अजित पाटील यांनी नायब तहसीलदार चेतन मोरे, योगेश चंदनशीव, तसेच लिपिक नेव्हील वऱ्हाडे तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली.

 लहान मुलांच्या हस्ते या आरक्षण सोडतीच्या चिट्ठ्या  काढण्यात आल्या. यावेळी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. खंडाळा तालुक्यातील एकुण ६३ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्ग – लोहोम, कवठे, केसूर्डी तर अनुसुचित जाती खुला प्रवर्ग – नायगाव, तोंडल ग्रामपंचायती राखीव झाल्या. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव – वाठार बुदुक, गुठाळे, वाघोशी, शिरवळ, गोळेगाव, कोपर्डे, लोणी, भाटघर, भादवडे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला – पाडेगाव, शिंदेवाडी, धनगरवाडी, कराडवाडी, अंबारवाडी, घाटदरे, दापकेघर, साळव या ग्रामपंचापती ना. मा. प्र. स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गासाठी -कर्नवडी, अंदोरी, सुखेड, बोरी, खेड बुद्रुक,शिवाजीनगर, पारगाव, निंबोडी, राजेवाडी, हरीपूर, बाळूपाटलाचीवाडी, पिसाळवाडी, . विंग, बावडा, सांगवी, म्हावशी, मोर्वे, असवली, अहिरे, शेडगेवाडी, कण्हेरी त्याच बरोबर सर्वसाधारण प्रवर्गासाठी -अजनुज, जवळे, हरळी, वडगाव, बावकलवाडी, पिंपरे बुद्रुक, भोळी, अतिट, कान्हवडी, मरीआईचीवाडी, लिंबाचीवाडी, भादे, पळशी, शेखमीरेवाडी, देवघर, घाडगेवाडी, मिरजे धावडवाडी, पाडळी, झगलवाडी ह्या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें