जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर:- म्हसोबाचीवाडी येथील मध्यवर्ती ठिकाणी आसलेल्या यशवंतराय मंदिर समोरील (यशवंतराय चौक) मोकळ्या जागेत गेल्या सोमवार दि.२४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या आठवडी बाजाराचा आजच्या दिवशीचा दुसरा दिवस आहे तसेच या आठवडी बाजाराला म्हसोबाचीवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचे आजच्या भरलेल्या आठवडी बाजारातील चित्र दिसत होते.
परिसरातील नागरिकांचा आठवडे बाजारास उत्स्फुर्त असा प्रतिसाद.
तसेच या बाजारामध्ये परिसरातील शेतकरी हा आपल्या शेतीमधील वेगवेगळ्या प्रकारचे वाण घेऊन दुपारी चार वाजेपासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत बसलेले दिसत होते व या वाणांची खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. तसेच या आठवडे बाजाराचा गावकऱ्यांच्या वतीने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या परिसरातील नागरिकांची चांगल्या प्रकारची सोय झाली असल्याचं मतं नागरिकांनी जनसंघर्ष न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहेत. तसेच आलेल्या व्यापारी व शेतकरी विक्रेते यांची मतं आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता , बहुतांश व्यापारी आणि शेतकरी विक्रेत्यांनी हा बाजार चालू झाल्यानं आम्ही विक्री करत असलेल्या पालेभाज्या , कडधान्य, मसाले तसेच फळं व इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगितले आहे.
या गावामध्ये आठवडे बाजार सुरू करण्यासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र राऊत यांच्याकडे हा बाजार चालू व्हावा म्हणून गावकरी , शेतकरी , व्यापारी हे सातत्याने मागणी करत होते याच गोष्टीची दखल घेत सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी दुपारी चार ते संध्याकाळी नऊपर्यंत आठवड्यातील दर सोमवारी हा बाजार भरणार असल्याचा निर्णय सर्व गावकऱ्यांनी मिळून घेतला असल्याचे सरपंचांनी बोलताना सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, या आठवडे बाजाराच्या उपक्रमामुळे संपूर्ण गावाचे अर्थकारण हे चांगल्या प्रकारचे होणार आहे तसेच शेतकरी विक्रेत्यांचा माल हा गावामध्येच विक्री होणार आहे तसेच खरेदीदाराला खरेदी करता येणार आहे त्यामुळे विक्रेत्याला अधिकचे चार पैसे मिळणार आहेत तसेच विक्रेते आणि खरेदीदारांची या उपक्रमामुळं गावातचं जीवनावश्यक वस्तुंची खरेदी व विक्री करण्याची सोय निर्माण झाली आहे तसेच त्यांना फळे , पालेभाज्या ,कडधान्ये व इतर गोष्टी विकत घेण्यासाठी बाहेरगावी जावं लागणार नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने अधिकच्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न यापुढे सुद्धा करण्यात येईल.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह