गोरगरीबांची जीवन वाहिनी म्हणून ओळख आसणाऱ्या ; लालपरीकडं, राज्यसरकार लक्ष कधी देणार ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे :- लालपरी बसमध्ये बसला नाही असा माणूस शोधून ही सापडणारचं नाही. गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून ते आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, तसेच भिकार्‍यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी लालपरी बसमध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ होय. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली. आपल्यातल्या जुन्या लोकांपैकी बर्‍याच जणांनी असल्या जुन्या बस बघीतल्या असतील. त्यानंतर बर्‍याच बसेस आल्या अन गेल्या. त्यांचे अंतर्बाह्य स्वरूप बदलले. सार्वजनिक प्रवासासाठी महामंडळ अस्तित्वात आले. प्रवासास अनेक सुखसोई असणार्‍या बसेस आल्यात .

१९६० ते १९८० सालच्या वेळी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे हाच एक पर्याय होता. त्यानंतरच्या काळात खाजगी लक्झरी बस प्रवासासाठी उपलब्ध झाल्यामुळे प्रवास बराचसा सुखकर झाला अशी प्रवाशांची समजूत झाली.

एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे आताशा काही प्रमाणात कमी प्रतीचे मानले जावू लागले. शहरी भागातल्या प्रवाशांमध्ये एसटी महामंडळाबद्दल उणे बोलणे फॅशन झाल्यासारखे वाटते. काही प्रमाणात शहरी भागात तसेच संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामिण भागात प्रवासासाठी एसटी बस शिवाय पर्याय नाही. ‘गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्य महामंडळाने ९९% खरे केले आहे. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरिता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. ती सवलत नाकारली तर महामंडळाचा नफा बर्‍याच प्रमाणात वाढू शकतो. तरीही केवळ सामाजिक दृष्टीनेच महामंडळ याकडे पाहत आलेले आहे. सरकार काही वेळा कर सवलत अन् इतर नियमांमध्ये महामंडळाला ही सुट देत नाही. सरकारने महामंडळा प्रती आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे.

२०२० साली पहिला कोरोना आला आणि पुर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्र थांबली त्यामध्ये गोरगरीबांच्या प्रवासाची खरी ओळख आसणाऱ्या लालपरीच्या चाकांना ही या कोरोनामुळं ब्रेक लागला आणि होत्याचं नव्हतं झालं एसटी महामंडळाचं आतोनात अस नुकसान या कोरोनामुळं झालं . कोरोना लॉक डाऊन संपल्यानंतर लालपरी पुन्हा रस्त्यांवर येऊन गावोगावी धाऊ लागली परंतू तिची अर्थव्यवस्था ही खिळखिळी झाल्यानं एसटीच्या फेऱ्या ह्या ५० टक्केवर आल्या. पहिल्या एसटीच्या फेऱ्या ह्या १०० टक्के होत असायच्या एसटीचे ब्रिदवाकयचं होतं “हात दाखवा आनं एसटी थांबवा ” ते पहिल  एसटी महामंडळानं तंतोतंत खर करून दाखवलं परंतू आज रोजी एसटी महामंडळाला २० हजार गाडयांची आवश्यकता आहे परंतू महामंडळाकडे फक्त १३ हजार गाडया उपलब्ध आहेत. आणि त्या १३ हजार गाड्यांमधील बऱ्याच गाड्या जुन्या झाल्यानं ठिकठिकाणच्या रस्त्यांवर बंद पडत आहेत त्यामुळं एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच बऱ्याच गावांना जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या सुद्धा बंद झाल्या आहेत. याचा नाहक त्रास ग्रामीण भागातील विद्यार्थी , वयस्कर व्यक्ती , आणि महिला यांना करावा लागतं आहे. त्यामुळं राज्य सरकारनं या महामंडळकडं लक्ष देऊन महामंडळाची लालपरी पूर्वपदावर आणण्यासाठी एसटीला ७ हजार नवीन गाड्या उपलब्ध करून देण्यात याव्यात एवढीच माफक अपेक्षा आता एसटी महामंडळ कर्मचारी व ग्रामीण भागातील प्रवाशांची आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें