विवाहित महिलेला,शितपेयात गुंगीचे औषध देऊन दोन नराधमांकडून ; बलात्काराचं चित्रीकरण करत वारंवार अतिप्रसंग.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

सांगली :- शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहित महिलेवर बलात्कार केला आहे. पीडित महिला ही परगावची असून, फजल याने तिला मार्च महिण्यात शीतपेयातून गुंगीचे औषध दिले होते. त्यामुळे पीडित महिला ही चक्कर येऊन बेशुद्ध पडली.या गुन्ह्याची नोंद सांगली शहर पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी तीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित फजल पटेल (वय ३६ वर्ष, ) राहणार-काळे प्लॉट, १०० फुटी रोड, पाकिजा मशीदी शेजारी, अल्फात करीम ( वय ३५ वर्षे ), राहणार-सांगली, अल्फाज पटेल राहणार – काळे प्लॉट) या संशयितांच्या विरोधात पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलात्काराचे व्हिडिओ चित्रण केल्यानंतर. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मार्च ते सप्टेंबरपर्यंत पीडित विवाहीत महिलेशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यात आले. त्यानंतर तिला हुबळी येथे विकण्यासाठी घेऊन जात असताना पीडित महिलेने मिरज येथे संधी साधून मोटरकारचा दरवाजा उघडून तेथून पलायन करून आपली सुटका करून घेतली आहे.

पोलीसांकडच्या माहितीनुसार झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या मुलाला व नवऱ्याला मारून टाकीन, अशी धमकी त्यांनी दिली. जुलै महिन्यामध्ये फजल याने तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार जबरदस्ती करून शरीरसंबंध ठेवले. सप्टेंबर महिन्यात पुन्हा पिडीत महिलेला फोन करून सांगलीमध्ये बोलावून घेतले होते. त्यानंतर तिला एका लाल रंगाच्या कारमध्ये बसण्यास सांगितले होते. तिने गाडीत बसण्यास नकार देताच, तिला पुन्हा तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे पीडित महिला ही गाडीत बसली. सदरील कार ही संशयित फजल याचा भाऊ अल्फाज चालवत होता.

पीडित महिला ही परगाव ची असून, मार्च महिन्यात फजल याने तिला शीतपेयातून गुंगी येणारे औषध दिले होते. त्यामुळे पीडित महिला चक्कर येऊन बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आली त्यावेळी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण करत होता. आपल्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग केल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या पीडित महिलेने त्या दोघांना, तुम्ही असे का केले म्हणून जाब विचारला असता संशयित फजल याने आपल्याजवळील आसणारा चाकू काढून पीडित महिलेच्या गळ्याला लावला होता. सदरच्या घटनेमुळे सांगली परिसर हादरला असून , नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहेत या बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून असे कृत्य करण्यास पुन्हा कोणी धजावणार नाही.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें