जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे (ता.५) – सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात सोमवारी (ता. ४) सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटांमध्ये किरकोळ वादातून थेट गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. भरचौकात दोन गावठी कट्ट्यांतून तीन राउंड फायर करण्यात आल्याने परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली.
प्राथमिक माहितीनुसार, वाहनाला गाडी घासल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला, जो काही क्षणांतच हाणामारी आणि नंतर गोळीबारात परिवर्तित झाला. फायरिंगनंतर आरोपींनी पिस्तूल उलट्या बाजूने मारहाण केली. काही जण जखमी झाले असले तरी सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही.
सायंकाळची गर्दीची वेळ, आजूबाजूला दुकाने, क्लासेस आणि बसथांबे असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. खडकवासला परिसर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना असून नांदेड सिटी पोलीस व गुन्हे शाखा तपासात गुंतले आहेत. या घटनेमागे पूर्व वैमनस्य की इतर गुन्हेगारी कारण आहे, याचा तपास सुरू आहे.
……

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह