जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- (दि.१९ ) समर्थ भारत वृत्तपत्राच्या निडर पत्रकार स्नेहा बारवे यांच्या वरती मंचर तालुक्यातील आंबेगाव येथे वार्तांकन करत असताना प्राणघातक हल्ला झाला होता. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी पत्रकार संघातर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या आंदोलन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने आवाज उठवण्याची गरज असल्याचे म्हटले.
सदरील निषेध मोर्चात आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुनील खिल्लारी यांनी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींवर वाढत्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली ते म्हणाले की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होणारे असे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचे काम हे सातत्याने करत असतात आणि अश्यांवरच अशा प्रकारचे हल्ले होणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की अशी हल्ले पुन्हा होऊ नये यासाठी सर्व लोकशाही मानणाऱ्या समाज घटकांनी एकत्र येऊन याविषयी आवाज उठवणे गरजेचे असल्याचे म्हटले समाजातील प्रत्येक घटकांनी विशेषता लोकशाहीवर विश्वास ठेवणारे प्रत्येकाने या हल्ल्यांविरोधात एकत्र येऊन आवाज उठवलाच पाहिजे तरच अशा घटनांना कुठेतरी आळा बसेल आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे वातावरण निर्माण होईल.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 58