👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणेः- (दि.१०) शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत असलेल्या भूमी अभिलेख या विभागाच्या मार्फत भूमी अभिलेख ह्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक सेवा ह्या शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत. या मधील काही सेवा ह्या मोफत दिल्या जातात तर काही सेवांसाठी राज्य सरकारकडून शुल्क आकारले जात असते.

या सेवांमध्ये प्रामुख्याने सातबारा उतारा ,8 अ, 8 ड, मालमत्ता पत्रक, तसेच जमीन मोजणी यांसह सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवा या विभागाच्या मार्फत उपलब्ध आहेत.

काही दिवसांपुर्वी भूमि अभिलेख विभागाच्या वतीने नवीन वेबसाईट उपलब्ध करण्यात आली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला नेमकं काय काय पाहता येणार आहे. ते खालील मुद्दे वाचल्यानंतर लक्षात येईल.

https://bhulekh.mahabhumi.gov.in/NewBhulekh/NewBhulekh.aspx

या वेबसाईटवरील काही सेवा शेतकऱ्यांसाठी मोफत आहेत यामध्ये गाव नमुना नंबर, सातबारा, 8 अ, 8 ड, मालमत्ता पत्रक या प्रकारची माहिती आपण मोफत पाहू शकता.

सातबारा पाहण्यासाठी प्रॉपर्टी यूआयडी नंबर असेल तर यूआयडी नंबर, मोबाईल नंबर टाकून सगळी माहिती पाहता येणार आहे. प्रॉपर्टी युआयडी नंबर नसेल तर नाही करून तुम्ही खालील माहितीवर क्लिक करून पाहू शकता.यात पहिल्या क्रमांकावर सातबारा, दुसरा 8 अ, तिसरा मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड पत्र तर अशा प्रकारची माहिती आपणास पाहता येणार आहे.समजा सातबारा बघायचा असेल तर सातबाऱ्यावर क्लिक करावे.

आपला जिल्हा निवडा, आपला तालुका निवडा, आपल्या गावाचं नाव निवडा. त्यानंतर गट नंबर टाकून सर्च करा. आपला मोबाईल नंबर टाकून, आपली भाषा निवडून कॅप्चा कोड टाकल्यानंतर.आपल्याला सातबारा पाहायला भेटणार आहे.अशा पद्धतीने इतर सुद्धा कागदपत्रांची प्रक्रिया करता येणार आहे.

अजून दुसरी एक वेबसाईट आहे, या वेबसाईटला प्रत्येक कामासाठी शुल्क आकारले जाते. ही वेबसाईटची लिंक पुढील प्रमाणे आहे.

https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/

वरील वेबसाईटवर अनेक ऑनलाईन सेवा कार्यरत आहेत, जसे की सातबारा उतारा पाहणे, 8 अ, मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी शुल्क आकारले जात असते.
यामध्ये आपल्याला सातबारा उतारा, 8 अ उतारा, फेरफार प्रत, मालमत्ता पत्रक, सातबारा फेरफारचा अर्ज, मालमत्ता फेरफार अर्ज, फेरफारची स्थिती, इत्यादी सेवांसह इतर सुद्धा बाबी आपल्याला यामाध्यमातून यापुढे तपासता येणार आहेत.

मालमत्ता फेरफार सुद्धा आपण करू शकणार आहे.
अशाच पद्धतीची एक फ्री सेवा देणारी वेबसाईट आहे तर दुसरी शुल्क अकारणारी वेबसाईट आहे अशा प्रकारच्या दोन स्वतंत्र वेबसाईट सध्या आता आपल्या सेवेत दाखल आहेत.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें