जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती :- (दि.८) पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने शुक्रवार दिनांक ७ रोजी पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपुर , बारामती येथे सर्व पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासाठी संवाद मेळावा व त्यांचा गुणगौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या संवाद मेळाव्यात ज्या ज्या पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांनी उल्लेखनीय कामगिरी केली,अशा मान्यवरांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच उपस्थितांना अपर पोलीस महासंचालकांनी मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त केले.
या सन्मान सोहळ्यामध्ये इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावचे सुपुत्र तसेच गावचे पोलीस पाटील ॲड.तुषार झेंडे पाटील यांनी सायबर सुरक्षा, ग्राहक संरक्षण कायद्याबाबत शाळा महाविद्यालये व नागरिकांमध्ये जनजागृती केल्याबाबत व तुती लागवडी बाबत मा. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून मार्गदर्शन होणे कामी पुर्वी मेळाव्याचे आयोजन केले होते या विशेष अशा उल्लेखनीय कामगिरीसाठी पुणे ग्रामीण पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपुर बारामती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. कृष्ण प्रकाश यांच्या शुभ हस्ते यावेळी गौरविण्यात आले.
या संवाद मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अपर पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश होते तसेच पोलीस अधीक्षक पुणे श्री पंकज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. अपर पोलीस अधीक्षक पुणे श्री. रमेश चोपडे , अपर पोलीस अधीक्षक बारामती श्री.गणेश बिराजदार , तसेच पोलीस उपअधीक्षक श्री. सुदर्शन राठोड, पुणे ग्रामीण हद्दीतील सर्व पोलीस उपअधीक्षक व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह