जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर :-भवानीनगर ता. इंदापूर येथे गुरुवारी (ता. ३० ) रोजी रात्री एका मुलीच्या प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार करण्यात आले, या प्रकरणात वालचंदनगर पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत सुजल जाधव व संचित बाळासो घोळवे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
घटनाक्रम
सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास, भवानीनगर येथील भवानी मातेच्या मंदिराजवळ सुजल जाधव, संचित घोळवे व त्यांचे सहकारी मित्र बसले असताना, अदनान महंमद शेख, पियूष प्रथम चव्हाण, यशराज गणेश अरवडे व दोन अल्पवयीन मित्र यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने वार केले. या मारामारीत सुजल जाधव गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत, तर संचित घोळवे देखील जखमी झाला आहे.
पोलिसांनी केली धडक कारवाई
वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डूणगे व पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर यांनी तातडीने मुलांना ताब्यात घेवून कारवाई केली. पुणे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अदनान महंमद शेख, पियूष प्रथम चव्हाण, यशराज गणेश अरवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सिनस्टाईल पाठलाग करून केली अटक
आरोपी पुण्याच्या दिशेने पळून चालले होते, मात्र वालचंदनगर पोलिसांनी तातडीने वेगवेगळी दोन पथके तयार करून पुण्याच्या दिशेने रवाना केली. सिनेस्टाईल पाठलाग करून सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्थानिक गावकरी यांच्या मदतीने आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. महाविद्यालयीन विद्यार्थी समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने मारामारी करत असल्याने पोलिसांनी दोन तासांमध्ये आरोपींना अटक करून भवानीनगर येथील बाजारपेठ मधून तीन मुलांना चालत फिरवत वरात काढली.
– भवानीनगर मारामारी
– प्रेमसंबंधातून वाद
– विद्यार्थी जखमी
– कोयत्याने वार
– पोलिस अटक

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह