टीसी कॉलेज व रेशीम उदयोग केंद्र बारामती यांच्या वतीने; रेशीम व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी हे गाव कायम दुष्काळी गाव म्हणून या गावाची ओळख; येथे दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला परंतू तेथील युवा उद्योजक शेतकऱ्यांनी ही ओळख पुसून टाकण्याचे काम केले आहे, त्याला कारण ठरलं तो तेथील आसणारा रेशीम उद्योग, तसेच या गावामधील रेशीमशेती तुती लागवडीचे क्षेत्र हे जवळपास 150 एकरच्या आसपास गेले आहे.
बारामतीमधील अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग व उद्योगजगता विकास केंद्र यांच्यामार्फत सदरील रेशीम व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, महाविद्यालयातील जवळपास 64 विद्यार्थ्यांनी व 15 रेशीम उद्योजक शेतकरी तसेच गावातील ग्रामस्थ या कार्यशाळा उपक्रमात सहभागी झाले होते.
रेशीम कार्यशाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये प्रगतशील रेशीम उद्योजक शेतकरी मनोज चांदगुडे यांनी विद्यार्थी तसेच उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ यांना रेशीम उत्पादन व रोजगाराच्या संधी या विषयांवरती मार्गदर्शन केले.तसेच दुपारच्या सत्रामध्ये केंद्रीय रेशीम बोर्ड बारामती येथील शास्त्रज्ञ हुमायू शरीफ यांनी रेशीम व्यवसाय, शासकीय अनुदान व रेशीम शेती योजना या विषयाच्या अनुषंगाने महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच रेशीम उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांना केंद्र सरकारच्या शासकीय योजना व अनुदानाच्या योजना याविषयी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनानंतर रेशीम उत्पादन कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक म्हसोबावाडी येथील रेशीम उत्पादनाच्या शेडवरती दाखवले गेले त्यासाठी डॉक्टर अविनाश जगताप , प्राचार्य डॉक्टर अशोक काळंगे व प्राचार्य सचिन गाडेकर, रजिस्टर अभिनंदन शहा , उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉक्टर विकास काकडे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर समाधान पाटील यांचे या कार्यशाळेला मार्गदर्शन लाभले , समन्वयक प्राचार्य संदीप साबळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य अमर नांदगुडे यांनी केले तसेच डॉक्टर ज्योतीराम घाडगे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींचे आभार मानले यावेळी या कार्यक्रम प्रसंगी नामदेव चांदगुडे , दत्तात्रय चांदगुडे, स्वप्निल चांदगुडे, सचिन चांदगुडे , मयूर चांदगुडे इत्यादी रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते. तसेच प्रगतशील रेशीम उद्योग शेतकरी मनोज चांदगुडे यांचे या कार्यक्रमाला विशेष असे सहकार्य लाभले.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai