दौंड हादरलं! खोटा पोलीस बनून आदिवासी विवाहितेवर अत्याचार.!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे: राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या गप्पा फक्त कागदावर राहिल्या आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील हाडगळे वस्तीवर तर थरकाप उडवणारी घटना घडली आहे. स्वतःला पोलीस असल्याचा खोटा आव आणत एका नराधमाने घराची तपासणी करायची आहे, असा बहाणा करून घरात प्रवेश केला आणि निरपराध आदिवासी विवाहित महिलेवर अत्याचार केला!
आरोपीचे नाव संतोष दादा हाडगळे असे असून, सकाळी पीडित महिला लहान मुलांसोबत घरात असताना तो सरळ घरात घुसला. मागून येऊन तिच्या कमरेला धरले आणि कुणाचंही भय न बाळगता बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. अशा घृणास्पद प्रकाराने संपूर्ण गावात संताप उसळला आहे.
महिलेने धैर्य दाखवत तात्काळ दौंड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि नराधमाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचाराचे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा तपास दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव दडसे करत आहेत. मात्र, अशा घटना थांबणार कधी? महिलांना घरातही सुरक्षितता नाही, मग त्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार? प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे असे नराधम दिवसेंदिवस बेधडक होत चालले आहेत.
ही घटना केवळ एका महिलेवरचा अत्याचार नाही, तर संपूर्ण समाजाच्या मानमरातबेला लागलेला काळा डाग आहे. जोपर्यंत अशा राक्षसांना कठोर शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कायम राहणार आहे!
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -७५८८६२२३६३
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool