जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई, ता.२३ : │ मराठा समाजाचा आक्रोश, असंख्य आंदोलनं, शेकडो बळी, हजारो जखमा… आणि तरीही आजवर न्याय न मिळालेला समाज! आता महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी मंत्रीमंडळ उपसमितीची पुनर्बांधणी जाहीर केली. पण समाजाच्या मनातला एकच प्रश्न – “ही समिती आमच्या भविष्याची हमी देईल की पुन्हा एकदा खोटी आश्वासनं देऊन आम्हाला फसवेल?”
या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा आता राधाकृष्ण विखे-पाटील तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांच्या वर सोपवली आहे. शिक्षण, वित्त, सामाजिक न्याय, सहकार, उद्योग, रोजगार हमी असे १२ मंत्री यात सामील आहेत. म्हणजेच शासनाने ताकदीचा यंत्रणा उभी केली आहे. पण ताकद कागदावर नाही, तर ती प्रत्यकत दिसली पाहिजे गावागावातल्या मराठा तरुणाच्या हातात, शेतकऱ्याच्या पोत्यात, विद्यार्थ्याच्या नोंदणी पत्रिकेत आणि नोकरीच्या नेमणुकीत!
समितीच्या जबाबदाऱ्या काय :
आरक्षणासाठी न्यायालयीन लढा – पण लढा फक्त वकिलांच्या तोंडाचा नव्हे, तर प्रत्यक्ष पुराव्यांचा आणि निर्धाराचा असावा!
शिक्षण, नोकरी आणि शिष्यवृत्ती यासाठी नवे दरवाजे खुले करणे – कारण आज मराठा विद्यार्थी गरिबीमुळे कायमचं शिक्षण सोडतोय.
मराठा समाजासाठी सुरु असलेल्या योजनांची काटेकोर तपासणी व्हावी, त्याच्यापर्यंत खरच लाभ पोहचतो आहे का? – नाहीतर फक्त फसवी जाहिरात नको, प्रत्यक्षात फायदा व्हावा!
आजवर किती समित्या झाल्या किती वेळा मराठा समाजाला स्वप्न दाखवलीत? आंदोलकांच्या रक्तावर तुम्ही वेळोवेळी सत्ता भोगलीत? प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या घरातील वृद्ध आईच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू, प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातातली निराशेची फी पावती आणि प्रत्येक तरुणाच्या हातातील बेरोजगारीचा रिकामा अर्ज… हेच आता सत्य आहे!
आज मराठा समाजाचा संयम संपला आहे. समित्या आम्ही अनेकदा पाहिल्यात, पण आता समाज फक्त एकच घोषणा करतो, ती म्हणजे –
🔥 “आरक्षण हा आमचा हक्क – तो मिळालाच पाहिजे!”
🔥 “ आता फसवणूक नको, ठोस निर्णय हवा!”
🔥 “आमच्या भविष्यासोबत खेळ करू नका – नाहीतर हा लढा प्रलय घेऊन होईल!”
मराठा समाजाची ही ज्वाला आता शांत बसणार नाही. उपसमितीचे सदस्य जर प्रामाणिकपणे काम करतील तर समाज त्यांना आशीर्वाद देईल; पण जर ढिलाई केली तर २९ तारखेला रस्त्यावर उतरलेला मराठ्यांचा महासागर राज्यकर्त्यांच्या गादी हादरवून टाकल्या शिवाय रहाणार नाही!
👉 ही समिती म्हणजे शेवटची संधी – आता न्याय नसेल तर संघर्षच हेच अंतिम उत्तर असेल!

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह