“वाळू माफियांचा अंत – आता खडी क्रेशरवर गाजणार का ? तहसीलदारांचा सडेतोड डंडा!”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर , ता.२१ : इंदापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे साम्राज्य मोडीत काढल्यानंतर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी आता खडी क्रेशरवर लक्ष केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनने उडवून देत वाळू माफियांची दहशत संपवणारे बनसोडे आजपासून म्हणजेच २१ ऑगस्ट २०२५ पासून तालुक्यातील सर्व खडी क्रेशर तपासणी मोहिमेला सुरुवात केली आहे. पण ही मोहीम कायमस्वरूपी अशीच चालू रहावी ही जनतेची माफक अपेक्षा आहे.
तालुक्यातील बहुतांश खडी क्रेशर मालक बेकायदेशीर मार्गाने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचल्या होत्या. या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत तहसीलदार जीवन बनसोडे यांनी शेटफळगडे, म्हसोबावाडी परिसरात  दि.२१ रोजी तब्बल १२ तासांचा कडक तपासणी मोर्चा  उघडला होता. महाराष्ट्रात दिवसातून इतक्या प्रदीर्घ वेळ काम करणारे व कायद्याच्या अंमलबजावणीत कठोर भूमिका घेणारे तहसीलदार म्हणून जीवन बनसोडे यांचे नाव राज्यभरात आता गाजू लागले आहे.
अवैध वाळू उपशामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते, तर आता खडी क्रेशरमुळे पर्यावरण, शेती व स्थानिक ग्रामस्थांचे जन जीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आवाज प्रदूषण, धुळीचे संकट, तसेच रस्त्यांची झालेली झपाट्याने नासधूस या सर्वांचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसतोय. अशा परिस्थितीत बनसोडे यांच्या या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे.
प्रशासनाच्या कारवाईमुळे अनेक अवैध क्रेशर चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. “आता पुढे कुठलीही बेकायदेशीर व अवैध हालचाल सहन केली जाणार नाही” असा स्पष्ट इशारा तहसीलदारांनी दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी ही कारवाई म्हणजे दिलासा देणारी बाब ठरली आहे. वाळू माफियांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केल्यानंतर आता खडी माफियांवर गाजणार का ?कायमसरूपी तहसीलदारांचा डंडा… जीवन बनसोडे यांच्या या धाडसी पावलामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता इंदापूरकडे लागून राहिले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai