जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर, ता.२१ : इंदापूर तालुक्यातील मौजे लोणी देवकर गावच्या हद्दीत आज पहाटे (गुरुवार, साडेतीन वाजता) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. क्लुझर जीपने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे कर्नाटकातील यल्लावा चौंडकी (वय ५०) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तब्बल १३ प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने उपचारासाठी भिगवण येथील लाईफलाईन हॉस्पिटल, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय तसेच काही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक तरुण व महामार्ग पोलिसांच्या मदतीने बचावकार्य पार पाडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व जखमी प्रवासी हे सर्व कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील आहेत. काल पुण्यात त्यांच्या नातेवाईकाचा अंत्यविधी पार पडल्यानंतर मध्यरात्री ते गावी परतत होते. मात्र, लोणी देवकर परिसरात आल्यानंतर चालक श्रीकांत कुलगैरी याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप समोरील अज्ञात वाहनाला धडकली.
अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पुढील भाग पूर्णतः चकनाचूर झाला. पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमींची नावे व स्थिती
सागर गणपती जानकर (२७, गंभीर)
परशु संगप्पा जानकर (३०, गंभीर)
महादेवी दोहमणी (६०, गंभीर)
रेणका अनिल परानवर (४०, किरकोळ)
रामक्का गणपती जानकर (५०, गंभीर)
लक्ष्मी परशु परानवर (३५, किरकोळ)
सुसलवा जानगर (६८, किरकोळ)
मुत्ववा परानवर (६०, गंभीर)
सुनंदा परानवर (५०, गंभीर)
सविता भिमु परानवर (३५, किरकोळ)
सित्तवा परानवर (७०, किरकोळ)
श्रीकांत कुलगैरी (३०, चालक, गंभीर)
गौरवा यलप्पा मनगोळी (५५, किरकोळ)
या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळेस वेग, थकवा आणि दक्षतेचा अभाव यामुळे असे अपघात घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क -७५८८६२२३६३

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 118