डासमुक्तीसाठी जनजागृतीची हाक : म्हसोबावाडी येथे जागतिक डास दिनानिमित्त उपक्रम.!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

इंदापूर, ता.२० : म्हसोबावाडी (ता.इंदापूर) येथे जागतिक डास दिनानिमित्त डासमुक्त गावासाठी जनजागृतीचा संदेश देत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र शेटफळगडे व त्याअंतर्गत उपकेंद्र निरगुडे यांच्या वतीने जि.प.प्राथमिक शाळा म्हसोबावाडी येथे हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व ग्रामस्थांना डासांमुळे पसरणारे आजार, डासांचे जीवनचक्र, त्यांचे प्रकार तसेच त्यांच्या उत्पत्तीची कारणे याची सविस्तर माहिती देण्यात आली. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या घातक आजारांपासून बचाव करण्यासाठी “कोरडा दिवस” पाळण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पाण्याचे साचलेले स्त्रोत नष्ट करणे, सांडपाणी थांबविणे व स्वच्छता राखणे यावर भर देण्यात आला.

यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, सदस्य व ग्रामस्थांशी संवाद साधून डासांपासून मुक्तीसाठी ग्रामपातळीवर उपाययोजना करण्याची गरज पटवून देण्यात आली. या दरम्यान म्हसोबावाडी गावठाण्यात कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून प्रत्येक घरामध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांना प्रत्यक्ष उदाहरणे दाखवत डासांच्या प्रजननस्थळांचा शोध घेऊन त्यांचे निर्मूलन करण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावली.

या कार्यक्रमाला ग्रा.पं. सरपंच राजेंद्र राऊत, डॉ. स्नेहल कारंडे (वैद्यकीय अधिकारी, प्राथ. आ. केंद्र शेटफळगडे), ता.आ. पर्यवेक्षक श्री. घुले, आ.निरीक्षक श्री. दिलीप पवार, श्री. सुधाकर चाबुकस्वार (आ. सहाय्यक), सौ. रेणुका कुलकर्णी, सौ. कीर्ती व्यवहारे, श्रीमती जयश्री शिंदे, श्री. पाठक, श्री. रणधीर, श्री. गायकवाड, श्री. मोठे, तसेच आशा सेविका सौ. पवार, सौ. राऊत, सौ. रणधीर आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये डासमुक्तीबाबत जागरूकता निर्माण झाली असून गाव पातळीवर “डासमुक्त म्हसोबावाडी” ही संकल्पना राबविण्यासाठी ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 डासांपासून बचावासाठी स्वच्छता हीच खरी लस, असा एकमुखी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क -७५८८६२२३६३

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai