सामाजिक बांधिलकी जपत ; स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हसोबाचीवाडी येथे शालेय साहित्याचे वाटप.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर, ता.१५:- इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या औचित्याने शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन म्हसोबाचीवाडी गावच्या सोसायटीचे चेअरमन अनिकेत झेंडे यांच्या वतीने करण्यात आले होते. या शालेय साहित्याचे वाटप चेअरमन अनिकेत झेंडे आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चांदगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाबद्दलची आवड वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाला गावातील मान्यवर, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिग्विजय साळुंके, पृथ्वीराज साळुंके, सौरभ चांदगुडे, अमोल पवार, संदीप पवार, प्रथमेश शिंदे, सुनील चांदगुडे, सचिन चांदगुडे, ओम पवार, अण्णासो चांदगुडे, सुनिल थोरवे, शाळेचे माजी शिक्षक हौशिराम चांदगुडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शालेय साहित्यच नव्हे, तर प्रोत्साहन आणि प्रेरणाही मिळाली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि शिस्त, परिश्रम व प्रामाणिकपणाने प्रगती साधण्याचा संदेश दिला. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात राष्ट्रध्वज वंदन, देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनीही रंगत आणली. शाळेच्या शिक्षकांनी व उपस्थितांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीची जाणीव आणि समाजसेवेची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला.

 

 

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool