निवडणुका पारदर्शकतेकडे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीस वेग.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी आणि पूर्वनियोजन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी मतदान केंद्रांची संख्या, तेथील सोईसुविधा, मनुष्यबळ, निवडणूक निर्णय अधिकारी, ईव्हीएम उपलब्धता आदींचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पाच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते. 1 जुलै 2025 पर्यंतची विधानसभेची मतदार यादीच वापरण्याचे नियोजन असून, भारत निवडणूक आयोगाची परवानगी लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाघमारे यांनी बहुसदस्यीय मतदारसंघांमुळे मतदान केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली. मतदान केंद्र ठरवताना सर्वसामान्य आणि दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक जिल्ह्याने ईव्हीएम उपलब्धतेचा आढावा घेऊन गरजेनुसार मागणी करावी, असेही त्यांनी सांगितले. मध्य प्रदेश निवडणूक आयोगाकडून यंत्रे मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.

सचिव सुरेश काकाणी यांनी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी आणि सुरक्षा उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी विभागातील संभाव्य लोकसंख्या, मतदान केंद्रांची स्थिती, मतदार यादी नियोजन आदींचे सादरीकरण केले. पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक पूर्वतयारीचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai