जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर :- ( दि.२८ जुलै) इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे दिनांक २६ व२७ जुलै रोजी पार पडलेल्या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेत पवार स्पोर्ट्स अकॅडमीच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत १४ वर्षे आणि १७ वर्षे वयोगटांत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून गावाचे नाव उज्वल केले.
ही स्पर्धा पवार स्पोर्ट्स अकॅडमी म्हसोबाची वाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे जिल्ह्यातील विविध नामांकित संघांनी सहभाग घेतला. १४ वर्षे वयोगटात मिलेनियम नॅशनल स्कूल पुणे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला, तर दुसरा क्रमांक मासा क्लब पुणे यांना मिळाला. पवार स्पोर्ट्स अकॅडमी म्हसोबावाडी चा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि BVC बारामती चतुर्थ स्थानी राहिला.
१७ वर्षे वयोगटात देखील अत्यंत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. या गटात प्रथम क्रमांक मिलेनियम नॅशनल स्कूल पुणे यांना मिळाला. पवार स्पोर्ट्स अकॅडमी म्हसोबाची वाडी ने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत ग्रामीण भागातील खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य दाखवले. तिसरा क्रमांक ज्ञानप्रबोधिनी निगडी तर चौथा क्रमांक वॉलनट पुणे यांना मिळाला.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पवार स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक श्री किरण पवार सर यांचे विशेष योगदान होते. स्पर्धेला अनेक मान्यवरांचे उपस्थिती लाभली. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री संदीप पवार, माध्यमिक विद्यालय म्हसोबाची वाडी शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री अंकुश पवार, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री लालासो साळुंखे, सोसायटीचे चेअरमन श्री अनिकेत झेंडे पाटील, माजी मुख्याध्यापिका माधवी सूर्यवंशी मॅडम, विष्णू व प्रवीण इंजिनिअरिंग बारामतीचे श्री विष्णू दाभाडे व रघुनाथ दाभाडे, यशवंत दूध संकलन केंद्राचे श्री पंकज चांदगुडे व गावचे लोक नियुक्त सरपंच श्री राजेंद्र राऊत यांचा समावेश होता.
कार्यक्रमात श्री संदीप कवडे, संदीप चांदगुडे, संतोष चांदगुडे, अण्णासाहेब चांदगुडे, स्वप्निल चांदगुडे, सुनील चांदगुडे तसेच म्हसोबावाडी क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य केले.
ही स्पर्धा म्हसोबाचीवाडी गावासाठी अभिमानास्पद ठरली असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या पवार स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्य निश्चितच स्तुत्य उपक्रम ठरला आहे. अशा प्रतिक्रिया आता खेळ प्रेमींकडून उमटू लागल्या आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह