जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूरः- ( दि.२४)बाहेरच्या जगात घडत असलेल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी कोणत्या ? आणि यामधून आपले स्वसंरक्षण कसे करावे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे म्हणून इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील माध्यमिक विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस युवक इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप चांदगुडे आणि पोलीस पाटील ॲड. तुषार झेंडे पाटील तसेच माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भोंग सर यांच्या माध्यमातून विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विनोद महांगडे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी बारामती विभागाचे शक्ती पथक यावेळी आले होते व त्यांचे मोलाचे मार्गदर्शन हे विद्यार्थी – विद्यार्थींनींना लाभले. सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणाचे धडे देण्यात आल्याने, ही एक चांगली गोष्ट झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण कसे करावे हे शिकायला मिळाले.
सविस्तर माहिती:
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.विनोद महांगडे यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणाचे धडे देण्यात आल्याने, हे एक विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आणि सकारात्मक पाऊल झाले आहे.
सुरक्षेची जाणीव:
स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षित राहण्याची जाणीव करून देणार.
आत्मविश्वास:
हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना स्वतःच्या बचावासाठी आत्मविश्वास देणार आहे, ज्यामुळे ते कोणत्याही संकटाचा सामना करण्यास तयार होतील.
धोक्याची जाणीव:
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांची जाणीव होईल आणि त्यावर कसे प्रतिक्रिया द्यायची हे देखील शिकायला मिळाले.
शारीरिक आणि मानसिक ताकद:
स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम बनवेल.
आपत्कालीन परिस्थिती:
विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याचे मार्गदर्शन मिळाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि स्वःताच्या संरक्षणाची चांगली व्यवस्था झाली.
तसेच या कार्यक्रमाला गावचे लोकनियुक्त सरपंच- राजेंद्र राऊत, पोलीस पाटील- ॲड. तुषार झेंडे , संदीप चांदगुडे, सोसायटी चेअरमन-अनिकेत झेंडे, आण्णासाहेब चांदगुडे, मनोज चांदगुडे, शेखर मोहिते, अमोल पवार, दत्तात्रय पवार, गणेश सुर्यवंशी, निखिल चांदगुडे, अंकुश पवार, व विद्यालयाचे शिक्षक तसेच ग्रामस्थ ,पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह