जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती : शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची मानकरी रेखा धनगर नरोटे ही बारामती तालुक्यातील
माळेगाव बुद्रुक येथील रहिवाशी तिचे शिक्षण Bped Mped झाले तिने घेतलेल्या मेहनतीमुळे तिला महाराष्ट्र शासनाचा 2024 सालच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आल्याने संपूर्ण बारामती परिसरातील क्रीडा क्षेत्रातील मुलींना यामुळे प्रेरणा मिळणार आहे.तिच्या संघर्षमय जीवनाची कहानी मांडली आहे आमच्या जनसंघर्ष न्यूजच्या प्रतिनिधींनी ती खालील प्रमाणे आहे.
तिचे नाव रेखा धनगर नरुटे मूळ गाव वाघळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील
वडील तिचे ट्रॅक्टर चालक तीला लहानपनापासून खेळाची आवड पण घरची परिस्थिती बेताचीच तसेच वडील हे ट्रॅक्टर चालक आणि घरामध्ये 5 बहिण- भावंडे असल्याने वडिलांच्या एकावर घर चालत नव्हते म्हणून ती सर्व बहिण-भावंड वडिलांना मदत होईल म्हणून शेतमजुरी करत होते पण तिला खेळाची आवड असल्यामुळे वडिलांना तिने सांगितलं मला स्पर्धेसाठी जायचंय तेव्हा वडील हो बोलल्यानंतर तिला खूप आनंद झाला .
त्यावेळी तिचे गुरु अजय देशमुख सर हे मार्गदर्शक म्हणून लाभले ती अकरावीत असताना तिने बेसबॉल खेळण्यास सुरुवात केली . तिला तिच्या गुरूंनी घरच्या परिस्थितीची कधी जाणीव होऊ दिले नाही तिचे सर्व खर्च तिच्या गुरुजींनी केला स्पर्धेसाठी जो लागणारा खर्च हा सगळा तिच्या गुरुजींनी केला कारण की तिच्या घरची परिस्थिती ही अत्यंत बेताची होती चांगल्या प्रकारे ती बेसबॉल खेळत होती जिल्हा विभाग राज्यस्तरीय राष्ट्रीय बेसबॉल मध्ये तिचे वर्चस्व चांगलं झालं तीची दरवर्षी महाराष्ट्राच्या टीम मध्ये निवड होत होती .
त्यानंतर तिचा विवाह अक्षय नरुटे यांच्या सोबत सन २०२३ मध्ये झाला त्यांना नंतर ही तीने तिचे खेळ सुरू ठेवले त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली हाँगकाँग येते या स्पर्धा झाल्या सासरच्यांचे तिला मोलाचे सहकार्य लाभले .
नंतर तिला 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांचा हस्ते प्रदान करण्यात आला . त्यानंतर या मिळालेल्या पुरस्काराने तिच्या जीवनाचे सार्थक झाल्याचे यावेळी तिने सांगितले तसेच या मिळालेल्या पुरस्कारामुळे बारामती तालुक्यात नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात तिच नाव झाल्याने तिने समाधान व्यक्त केले आहे. या तिला मिळालेल्या पुरस्काराने इतर मुलींना प्रेरणा मिळणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह