जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
शिरवळ :- ( दि.९)सातारा, लोणंद तसेच शिरवळ परिसरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे. लोणंद ते शिरवळ आणि सातारा ते लोणंद या एकूण ७२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ४३७ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, असे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले.
या नव्या निर्माण होणाऱ्या रस्त्यामुळे लोणंद ते शिरवळ तसेच सातारा ते लोणंद मार्गावरील पेव्हड शोल्डर (पक्का खांदा) पद्धतीच्या रस्त्याचे काम करण्यात येणार असून. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल आणि नव्या रस्त्यामुळे लोणंद, शिरवळ व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी जलद, सुरक्षित आणि दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.
या नवीन होणाऱ्या रस्त्यावरती १३ आणि १९ अशा एकूण ३२ पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच, ७ नवे जंक्शन्स तयार करण्यात येणार आहेत. लोणंद-सातारा मार्गावर ३ नवे पूल उभारण्यात येणार, आहेत तसेच शिरवळ – सातारा – लोणंद या मार्गावरती तब्बल १३१ कल्व्हर्टस बांधण्यात येणार आहेत. रेल्वे किंवा रस्ता खालून पाण्याचा पाट किंवा नळ मुंबई यांसारख्या व्यवस्थेला कल्व्हर्टस असे म्हटले जाते.
पुणे-बेंगलोर महामार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा या रस्त्यांवरून वाहनांची वर्दळ खूपच वाढली आहे. यावर केलेल्या निरीक्षणामध्ये दररोज शिरवळ-लोणंद मार्गावरती तब्बल ९५४३ वाहने आणि लोणंद-सातारा या मार्गावरती १११७५ वाहनांची वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच पावसाळ्यात या मार्गावरील रस्त्याचा दर्जा सुधारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितिन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून या रस्त्याच्या निधीस मंजुरी मिळालेली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांनी या रस्त्याच्या निधीस तात्काळ मान्यता दिली व हा निधी मंजूर करण्यात आला.
या होणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे शिरवळ, लोणंद आणि सातारा परिसरातील नागरिकांना जलद आणि सुरक्षित वाहतूक सुविधा मिळणार आहे. विकासाच्या गतीमानतेसाठी ही एक अत्यंत महत्वपूर्ण पायरी असणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह