पेट्रोल दरवाढीमागचं वास्तव जनतेसमोर यावं म्हणून प्रत्येक पंपावर माहिती फलक लावण्याची गरज.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे : (दि.२९ जुलै) आजच्या घडीला पेट्रोलच्या दरात झपाट्याने वाढ झालेली असताना सर्वसामान्य नागरिकांना नेमकं पेट्रोलच्या दरामागचं गणित समजत नाही. त्यामुळे दर वाढीला नेमकं कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट होण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर दरवाढीचा तपशील असलेला फलक लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

उदाहरणार्थ, सध्याच्या पेट्रोल दराचा तपशील पाहिला, तर प्रति लिटर पेट्रोलचा मूलभूत दर फक्त ₹35.50 इतका आहे. मात्र त्यावर केंद्र सरकारचा ₹41.55 इतका कर लावला जातो, तर राज्य शासनाचा कर ₹19.50 इतका आहे. याशिवाय वितरकाचा नफा आणि खर्च ₹6.50 धरल्यास एकूण किंमत ₹103.05  इतकी होते.

यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या करांचा मोठा वाटा असून, मूळ उत्पादनाच्या जवळपास तीन पट दर ग्राहकांकडून आकारला जातो. या माहितीची जनजागृती होणे गरजेचे असून, त्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर वरीलप्रमाणे दरवाढीचा तपशील असलेले बोर्ड लावले गेले पाहिजेत. जेणेकरून खरी माहिती जनतेसमोर येईल .

यामुळे ग्राहकांमध्ये पारदर्शकता निर्माण होईल आणि इंधन दरवाढीबाबतचा खरा दोष कोणाचा आहे, हे स्पष्ट होईल. लोकशाहीत जनतेला माहिती मिळणं हा मूलभूत हक्क आहे आणि इंधन दरवाढीमागचं वास्तव सरकारने लपवू नये, अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai