स्मार्ट मीटरचा वेग वाढला, ग्राहकांच गणित बिघडण्याची शक्यता.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे :-राज्यात महावितरण कंपनीने पारंपरिक विजेचे मीटर काढून ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याची मोहीम गतीने सुरू केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक ग्राहक या निर्णयाला तीव्र विरोध करत आहेत. विरोध असूनही काही ठिकाणी कंपनीचे कर्मचारी चुकीची माहिती देत, चोरून किंवा जबरदस्तीने हे मीटर बसवत असल्याचे आरोप आहेत.

या नव्या ‘स्मार्ट मीटर’च्या कार्यक्षमतेबाबत चिंता वाढली आहे. प्रात्यक्षिकात, एकसमान विद्युत उपकरणे दोन वेगवेगळ्या मीटरला जोडण्यात आली. १० तासांनंतर पारंपरिक मीटरने २१९ युनिटचा वापर दाखवला, तर स्मार्ट मीटरने तब्बल ४७९ युनिट दाखवले. यावरून स्मार्ट मीटर पारंपरिक मीटरपेक्षा सुमारे ६० ते ७० टक्के अधिक युनिट दाखवत असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी ग्राहकांचे वीज बिल मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

महावितरण कंपनीचा उद्देश वीज गळती, चोरी आणि प्रणालीतील अपयश रोखणे असला तरी ग्राहकांच्या परवानगीशिवाय आणि विश्वासात न घेता ही सक्ती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठात या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. ग्राहकांना स्मार्ट मीटर ऐच्छिक ठेवावेत, आणि दोन्ही मीटरचे तुलनात्मक बिल देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, प्रत्येक स्मार्ट मीटरची किंमत सुमारे १२ हजार रुपये असून, ही रक्कम ग्राहकांकडून हप्त्यांमध्ये वीज बिलात समाविष्ट करून वसूल केली जाणार आहे. ही एकूण रक्कम ३४२ कोटी रुपयांहून अधिक असून, यावरही ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील ग्राहकांचा विरोध, स्मार्ट मीटरची अधिक गती आणि वाढणाऱ्या आर्थिक भाराच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेने आणि ग्राहकांच्या विश्वासात घेऊन राबवणे अत्यावश्यक आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें